भगवा चौक सध्यातरी अतिक्रमणमुक्त

अजित नाडगीर 
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : 'अनधिकृत फलकांचा सुळसुळाट' अशी बातमी नुकतीच सकाळ संवादमध्ये प्रसिद्ध झाली होती. अखेर कारवाई करून भगवा चौक अतिक्रमणमुक्त झाला आहे. त्याबद्दल "सकाळ' व महापालिकेचे आभार; पण पुन्हा या चौकात असे फलक लागणार नाहीत, यासाठी महापालिकेने कायमस्वरूपी काहीतरी उपाययोजना करावी. हा प्रश्न फक्त एका प्रातिनिधिक चौकापुरता सुटला. अशीच धडाडीची कारवाई महापालिकेने पूर्ण शहरभर राबवली तर 'शहर सुंदर होणे' अवघड नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhagva Chowk is currently free from encroachment