‘नो पार्किंग’चे फलक केवळ नावापुरतेच उरले

PNE18O92051.jpg
PNE18O92051.jpg

नाशिकरस्ता : नाशिकरस्ता परिसरात ‘नो पार्किंग’चे फलक केवळ नावापुरतेच उरले आहेत. याठिकाणी बिनधास्तपणे पार्किंग करत नियमांचे उल्लंघन केले जाते. नाशिक रस्त्यावर बिटको चौकात जेलरोडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरवातीलाच 'नो पार्किंग' बोर्ड लावलेला असून 100 मीटरची मर्यादा त्यावर देण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात रिक्षाचालक रस्त्यावर त्याठिकाणी उभे असतात. तसेच खाजगी वाहन चालक रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क करतात. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com