#WeCareForPune. सातारा रस्त्यावर बस थांब्याचे निवारा शेड गायब

चंद्रकांत गुरव
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. #SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : सातारा रस्त्यावर स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या सातारा रस्त्यावर पीएमपी बससाठी बीआरटी उभारले आहे. तेथे बसचे थांबे निवारा शेडसह बांधले आहेत. मात्र आता बीआरटी बससाठी बंद आणि इतर सर्व वाहनासाठी खुले केले आहेत. त्यामुळे पीएमपीची बस बीआरटी मधुन न धावता बाहेरुन धावतात. त्यामुळे बस थांबे उघड्यावर उन्हा-तान्हात सुरु केले आहेत. तेथे निवारा शेडच नाहीत म्हणुन प्रवासी उन्हात उभे राहतात. त्यात आंबेगाव, जांभुळवाडीकडे जाण्यासाठी एक तासाने बस असते. त्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत. तरी पीएमपी प्रशासनाने काहीतरी व्यवस्था लवकर करावी. स्थानिक नगरसेवकांनी यामध्ये लक्ष घालावे. 
 

Web Title: Bus shelter shelter on Satara road disappears