
पुणे: राजाराम पुला जवळ महिन्याभरपूर्वी एका मोठ्या गृहप्रकल्पचे उद्घाटन झाले. त्यावेळी पदपथावरील वरील ब्लॉक्स काढून ती जागा सुशोभित करण्यात आली. मात्र काढलेले ब्लॉक्स आणि राडारोडा शेजारी असलेल्या डीपी पाशी टाकून देण्यात आला. ह्या संदर्भात गृह प्रकल्पातील मॅनेजरला प्रत्यक्ष भेटून याची कल्पना दिली. दोन दिवसात हा राडारोडा काढून टाकण्यात येईल असे त्यांनी सांगितले. चार दिवसानंतर चौकशी केली असता हा राडारोडा हटवण्याची जबाबदारी महापालिकेचे आहे असे तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांगितले. तरी जे कोणी यासाठी जबाबदार असतील त्यांनी राडारोडा त्वरित उचलावा ही नम्र विनंती.
पुणे: राजाराम पुला जवळ महिन्याभरपूर्वी एका मोठ्या गृहप्रकल्पचे उद्घाटन झाले. त्यावेळी पदपथावरील वरील ब्लॉक्स काढून ती जागा सुशोभित करण्यात आली. मात्र काढलेले ब्लॉक्स आणि राडारोडा शेजारी असलेल्या डीपी पाशी टाकून देण्यात आला. ह्या संदर्भात गृह प्रकल्पातील मॅनेजरला प्रत्यक्ष भेटून याची कल्पना दिली. दोन दिवसात हा राडारोडा काढून टाकण्यात येईल असे त्यांनी सांगितले. चार दिवसानंतर चौकशी केली असता हा राडारोडा हटवण्याची जबाबदारी महापालिकेचे आहे असे तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांगितले. तरी जे कोणी यासाठी जबाबदार असतील त्यांनी राडारोडा त्वरित उचलावा ही नम्र विनंती. अशा प्रकारचा राडारोडा अन्य अनेक रस्त्यांवर पडलेला आहे. कालांतरानी तो मेन होल मधून आणि अन्य ठिकाणाहून नाल्यांमध्ये अडकतो आणि आपणच सर्वजण मोठ्या दुर्घटनेला जबाबदार ठरतो याचा प्रत्यक्ष अनुभव नुकताच पुणेकरांनी घेतला आहे. तरी याची दखल घेतला जावी.