कुपनलिकांवर नियंञण ठेवा

दत्ताञय फडतरे
मंगळवार, 29 मे 2018

पुणे : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कुपनलिका घेण्याचा सपाटा चालु आहे .एकीकडे भुगर्भातील पाण्याचे साठे कमी होत चालले आहेत दुसरीकडे याबाबत प्रशासन पातळीवर याची नोंद ठेवण्याचे प्रमाण अगदी कमी असल्याचे पाहायला मिळते.

कुपनलिकांची किती खोली असावी, कुपनलिकांमधील अंतर किती असावे, याबाबत कायदे आणि नियम असुनही याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे .निसर्गाचा होत असलेला विध्वंस आणि पाण्यासाठी भुगर्भाची होणारी चाळण थांबविण्यासाठी निसर्गप्रेमी संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.तसेच कुपनलिकांबाबत स्थानिक ग्रामपंचायतीनीं नोंद घेवुन पंचायत समिती व जिल्हापरिषदेने त्यावर मोठ्या प्रमाणात नियंञण ठेवणे आवश्यक आहे.

Web Title: control the tube-wells