बोपदेव घाटात संरक्षण कठडे बसवा

- दत्ताञय फडतरे (पुणे)
Sunday, 3 March 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : बोपदेव घाट- सासवड मार्गावरील रस्त्याच्या कामांसाठी लाखो रुपये खर्च केला जात आहे. कामाचा प्रचार ही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. परंतु घाट परिसरातील अपघाती व तीव्र वळणांचे रुंदीकरण करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. पुणे शहरातून सासवडकडे जाताना घाट परिसरात रस्त्याच्या बाजुला संरक्षणासाठी असणारे ठोकळे बसविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

प्रवाशांचे अपघातापासुन संरक्षण होण्यासाठी, रस्त्याच्या बाजुला तीव्र अपघाती भागात, संरक्षणासाठी ठोकळे व शेवटच्या भागातील अपघाती वळणांवर मजबुत संरक्षण भिंत नाही याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढत असलेल्या घाटातील दुर्लक्षित याबाबींकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cover Bopdev Ghat with security wall