शिल्पाचा चबुतरा केला दुरुस्थ : सकाळ संवाद परिणाम 

नितीन राजे 
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : औंध येथील विद्यापीठ मार्गावर असणाऱ्या कस्तुरबा वसाहतीजवळील चौकात उभ्या असणाऱ्या शिल्पाचा चबुतरा वाहनचालकासाठी धोकादायक बनला आहे. याबाबत सकाळ संवादमध्ये बातमी 23 सप्टेंबरला प्रसिध्द करण्यात आली होती. याची संबंधिताने त्वरीत दखल घेतली आहे. या चबुतराजवळ ठेवण्यात आलेला विटांचा राडारोडा तेथून हटविण्यात आला आहे. तसेच लोंबकळणारी पाईप ही सुरक्षित ठिकाणी लावण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकासाठी चौकातून ये-जा करणे सुरक्षित बनले आहे. समस्येची दखल घेतल्याबद्दल सकाळ आणि महापालिकेचे आभार.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Craft Pivot is repaired In Kasturba Chowk by pmc due to sakal samvad news

टॅग्स