कोथरुड बिग बाजारमध्ये ग्राहकांची फसवणुक!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 September 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे: कोथरुड येथील बिग बाजारमध्ये ऑफर मुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात उघडपणे फसवणूक होत आहे. एकावर एक फ्री, एका शर्ट वर एक पॅन्ट फ्री, एक लिटर दुध 25 रुपयेला अशा अनेक ऑफर याठिकीणी चालु आहेत. वास्तविक बिलिंग करताना त्यांचे लोक सांगतात की ऑफर कालच संपली, ऑफर दुसऱ्या प्रॉडक्‍टवर आहे, पुढच्या आठवड्यात सुरू होत आहे. दुधाची एक्‍सपायरी संपली असल्याने येथे दुध स्वस्तात दिले जात आहे. याने ग्राहकांचे स्वास्थ्य पणाला लागले आहे. ब्रॅंडेड कंपनीच्या नावाखाली ही फसवेगिरी सुरू आहे.

शिवाय तेथील स्टाफ देखील खूप जास्त प्रमाणात मनमानी करताना दिसतो आहे. येथे कोणीही सुपरवायझर नसल्याचे दिसते आहे. ग्राहकांची उघडपणे फसवणूक थांबवून तातडीने कारवाई होणे आवश्‍यक आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Customers cheated at Kothrud Big Bazar