esakal | #WeCareForPune: पुण्यात नियम डावलून दहीहंडी साजरी
sakal

बोलून बातमी शोधा

Dahi-handi

#WeCareForPune: पुण्यात नियम डावलून दहीहंडी साजरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : वारजे हायवे परिसर आणि कालवा रोडवर दही हंडी आणि गोकुळअष्टमी दिवशी सगळे नियम डावलून दही हंडी साजरी केली गेली. हायवे परिसरत विनायक हॉस्पिटल ते आदित्य गार्डनसिटी येथे 50 मीटर वर वेग-वेगळी दही हंडी होती. यामुळे मोठ्या प्रमाणात वहातुक कोंडी झाली.

मार्यदेच्या दुप्पट आवाजाचे डॉल्बी लावून अनेक जण रस्त्यावर हुल्लडबाजी करत होते. यामुळे सेवा रोड वरचे विजेचे खांब खाली पाडले होते, आकडे टाकून वीज घेतली गेली होती, आजूबाजुची झाडे तोडून मांडव घातले होते.

केलवा रोड वर देखील हीच परिस्थिती होती. सगळे नियम खुलेआम डावलले जात असताना देखील, पोलिस फक्त गोंधळ बघण्याची भुमिका पार पाडत होते. वास्तविक येथील सत्ताधारी आणि विरोधक यांच्या सत्ता स्पर्धेच्या इर्षेमुळे हे असे प्रकार सरर्स घडवले जात आहेत. पोलिसांनी कृपया सामान्य नागरिकांकडे देखील लक्ष द्यावे आणि नियम मोडणाऱ्या मंडळानवर तातडीने गुन्हे दाखल करावेत.

loading image
go to top