पीएमटी कॉलनीसमोर राडारोडा आणि अस्वच्छता

सिद्धांत मनोज गावडे.
मंगळवार, 24 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

स्वारगेट : घोरपडे पेठ येथील रेल्वे बुकींग ऑफिस समोरीस पीएमटी कॉलनी क्रमांक 7 (प्रभाग क्र.18) मध्ये पीएमटीच्या कामगारांच्या एकूण 5 इमारती असून,96 सदनिका आहेत.  पीएमटी कॉलनी समोर खाजगी बांधकाम सुरू असून त्याचा राडारोडा व माती रस्त्यावर पडत आहे. पावसामुळे सर्व रस्त्यावर चिखल साचत आहे. त्यामुळे रहिवाश्यांना चालताना तसेच वाहतूक चालकांना कसरत करावी लागत आहे.  

येथील बांधकाम व्यावसायिकाने उपलब्ध केलेल्या पर्यायी रस्त्यावरही लाईट  नसल्यामुळे महिला व मुलींना रात्रीच्या वेळी त्या रस्त्याचा वापर करणे शक्य होत नाही आहे. तसेच येथील कचरा पेटी देखील रस्त्यावरच आहे आणि त्यामध्ये इतर बाहेरील जागेवरचा कचरा आणून टाकला जातो. त्यामुळे कचरा पेटी तुडुंब भरून सर्व कचरा बाहेर पडत आहे. यामुळे परिसरात आजार व रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच कॉलनी मध्ये रस्त्यावरील विद्युत खांब देखील बंद आहेत. सर्व समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी रहिवाशांची मागणी आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: debris and sanitation in front of PMT colony