#WeCareForPune नागरिकांसाठी पिण्याचे पाणीच नाही

चंद्रकांत गुरव
Wednesday, 12 June 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

 

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

#SakalSamvad #WeCareForPune 

 

 

पुणे : आंबेगांव खुर्द  या गावाचा पुणेमनपा मध्ये समावेश झाल्यानंतर येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुणे मनपाचे कार्यालय सुरु झाले. याठिकाणी करसंकलन, नवीन करनोंदणी, फेरफार, दुरुस्ती, नांव हस्तांतर इत्यादी विविध गोष्टी नागरिकांसाठी केल्या जातात. त्यामुळे लोकांची तेथे सतत वर्दळ आणि ये-जा असते. परंतु येथे नागरिकांनी पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नाही. तेथे पिण्याचे पाण्याचे मोडके उपकरण ठेवलेले आहे, ते पुर्णपणे बंद आहे. तरी किमान प्राथमिक सुविधा तरी उपलब्ध होतील याकडे मनपाच्या वरीष्ठ अधिकारी वर्गाने तातडीने लक्ष द्यावे.

लाखो-करोडो रूपयाचा महसुल जनतेकडुन घेणाऱ्या मनपाने पिण्याचे पाणी नागरीकांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करुन द्यावे, अशी अपेक्षा.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The defect of the chamber and the road