बंद एटीएममुळे ग्राहकांची गैरसोय

चंद्रकांत गुरव
सोमवार, 3 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या कात्रजजवळील आंबेगांव खुर्दमध्ये घरबांधणी जोमात सुरु झाली आहे. या परिसरात इमारतींची संख्या वाढली आहे. त्यामुळे या परिसरात अॅक्सिस बँक, आयसीआय या बँकांनी उत्साहाने नवीन एटीएम सुरु केली. मात्र, ती नावालाच आहेत. हे एटीएम सतत बंद असतात आणि पैसे नसतात. तशीच बहुतांशी अवस्था शनिनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र आणि अॅक्सिस बँकेच्या एटीएमची आहे. डिजिटलचा डंगोरा पिटणाऱ्यांनी आणि संबंधित बँक अधिकाऱ्यांनी काय ती व्यवस्था करावी आणि कालावधी ठरवून येथे पाहणी करावी, ही विनंती. 

Web Title: Disadvantage of customers due to closed ATMs