#माझी_परसरबाग : जाणुन घ्या...गुलाबाचा हजारो वर्षांचा इतिहास

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 February 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.

#SakalSamvad #WeCareForPune #MyBalconyGarden

गुलाबाचा रंग, रूप सर्वांच्या मनावर गारूड करते. या गुलाबाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. अठराव्या शतकात ‘रोझा चायनेसीस' हा गुलाब चीनमधून आशियाई देशात पसरला. इस्ट इंडिया कंपनीने कोलकत्यामधून बोटीद्वारे चीनमधील गुलाब इंग्लंडमध्ये पाठविले. पुढे हा गुलाब १७९३ च्या दरम्यान संपूर्ण युरोपात पसरला. 

सन १८०० च्या दरम्यान फ्रान्सचा सम्राट नेपोलियन याची पत्नी जोसेफाइन हिने गुलाबाच्या बागेत २५० गुलाब प्रजातींची लागवड करून काळजीपूर्वक जोपासना केली होती. १८३७ मध्ये चीनमधील बहुतेक गुलाब जाती युरोपमध्ये पोचल्या होत्या. त्यातूनच ‘हायब्रीड परपेच्युअल' ही संकरित फ्रेंच प्रजात तयार झाली. या जातीचे पूर्वज म्हणजे बॉरबोर्न, दमास्क, चायना, पोर्टलॅंड, कॅबेज, टी आणि नॉइसिटी रोझेस या जाती आहेत. 

हायब्रीड टी या गुलाबाची उत्पत्ती हायब्रीड परपेच्युअल आणि टी रोझेस या दोन्हींच्या संकरातून झाली. त्यानंतर नॅशनल रोझ सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटनने या गुलाबाला एक वेगळा गुलाबाचा प्रकार म्हणून दर्जा दिला. तेव्हापासून आजतागायत हायब्रीड टी (एच.टी.) हा प्रकार अत्यंत लोकप्रिय आहे. १८६७ साली 'ला फ्रान्स' हा सर्वांत प्रथम संकरीकरणातून तयार झालेला गुलाब. 

१९०० च्या दरम्यान रोझा मल्टिफ्लोरा व छोटेखानी चायना रोझ यांच्या संकरातून छोट्या-छोट्या फुलांचे घोस येणारी पॉलीएन्था ही नवी प्रजात तयार झाली. डेन्मार्कचे संकरतज्ज्ञ पोल्सन यांनी पॉलीएन्थाच्या वेगवेगळ्या प्रजातींचे संकरीकरण केले. १९२० साली पोल्सन यांनी पॉलीएन्था आणि हायब्रीड टीच्या संकरातून फ्लोरीबंडा ही जात विकसित केली. गुलाबाच्या इतिहासात हा महत्त्वाचा टप्पा ठरला. 

मॉरिशस बेटावरील मिनीएचर ही एक लोकप्रिय गुलाब जात. १८१५ दरम्यानचा हा मूळ रोझा चायनेसीस मिनीमा. वैशिष्ट्यांमुळे ही जात १९२० साली स्वित्झर्लंड आणि ब्रिटनमध्ये चांगली रूजली. कमी उंची आणि भरपूर फुले देण्याची क्षमता असलेली ही जात आहे. कॅलिफोर्नियातील संकरतज्ज्ञ राल्फमूर यांनी मिनीएचरच्या संकरीकरणात आपले आयुष्य वाहून घेतले. अशा रितीने जगभरात टप्याटप्याने विविध रंगांच्या जाती विकसित होत आहेत. 
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: do you know the history of history of Rose thousands of years