गोखलेनगर परिसरात  भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव 

एक सजग नागरिक
Friday, 2 August 2019


पत्रकारनगर ः कामायनी रस्ता, गोखलेनगर परिसरात भटकी कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. 

पत्रकारनगर ः कामायनी रस्ता, गोखलेनगर परिसरात भटकी कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. 
कुत्र्यांवर नसबंदी करण्यासारख्या परिणामकारक उपाययोजनांची अंमलबजावणी महापालिकेकडून होणे गरजेचे आहे. मोकाट जनावरांना प्राणिप्रेमी खाऊ घालतात, परंतु ते बहुदा शिळे अन्नच असते. येथील टेकड्यांवर अनेकदा कुत्रे, मांजरी जी लोकांना सांभाळता येत नाहीत ती सोडून दिली जातात, म्हणून या परिसरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. मोकाट कुत्री रात्रीच्या वेळी येथील नागरिक आणि इतर पाळीव प्राण्यांवर हल्ला करतात. दिवसा दुचाकीवर जाणाऱ्या महिला तसेच फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक, या भागातील शाळेत चालत जाणारी मुले यांच्यावर हल्ला केल्यामुळे त्यांच्यात भय निर्माण झाले आहे. महापालिकेने यावर त्वरित लक्ष घालून उपाय करावे, तसेच प्राणिप्रेमींना विनंती आहे, की या मोकाट जनावरांना फक्त रस्त्यावर शिळे अन्न खायला न घालता कायमस्वरूपी आपल्याकडेच ठेवून घेऊन त्यांची पूर्णतः काळजी घ्यावी. 
- एक सजग नागरिक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dog infestation in Gokhalenagar