धूळ-धुराचा धोका मोठा

डॉ. अनिल मडके
रविवार, 7 जानेवारी 2018

धुळीमुळे वाढणारा दुसरा गंभीर विकार म्हणजे आयएलडी अर्थात इंटरस्टीशियल लंग डिसीज. स्पंजासारखे असणारे फुफ्फुस या विकारात जागोजागी बत्ताशासारखे होते.

स्वच्छ- धूळविरहित रस्ते  हे चित्र आपल्यासाठी आता स्वप्नवत आहेत. अगदी खेडीही त्यापासून मुक्त नाहीत. राज्यात आणि जिल्ह्यात धुळीमुळे होणाऱ्या आजारांच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. धूळ श्‍वसन विकाराचे मुख्य कारण आहे. धुळीचे रस्त्यांवर अक्षरश: लोट दिसतात. ती केवळ रस्त्यावर न राहता ती घरात, कार्यालयातही दिसते. धुळीने त्रस्त नागरिक सर्वत्र आहेत. सीओपीडी, आयएलडी आणि दमा असे  विकार सर्रास बळावले आहेत. या धुरात सल्फरडाय ऑक्‍साईड, कार्बन डायऑक्‍साईड, नायट्रेटस आणि कार्बन मोनॉक्‍साईड असे विषारी वायू असतात. त्यातून श्‍वसनविकार बळावतात.  मोकाट जनावरे. त्यांच्या मल मूत्र विसर्जनावर बंधन नाही.

जनावरांबरोबर काही माणसेही रस्त्यावर आपला विधी उरकतात. त्यावरचे धुलीकन नाकावाटे शरीरात मिसळतात. पुन्हा श्‍वसन विकाराला निमंत्रण. सीओपीडी हा श्‍वसनविकार वयागणीक तीव्र होत जातो. यामध्ये फुफ्फुसाच्या पेशी पुन्हा दुरुस्त न होण्यासाठीच खराब होतात. त्याची आकुंचन प्रसरण क्षमता कमी होते. बरेच रुग्ण त्याला दमा समजून उपचार घेतात. दम, धाप वाढला की रुग्ण अत्यवस्थ होतो. त्यामुळे अशा रुग्णांना जंतूसंसर्ग जीवघेणा ठरु शकतो.

धुळीचे प्रमाण २२९ मायकोग्रॅमपर्यंत...
मायक्रोग्रॅम प्रतिचौरस मीटर (क्‍यूब) १०० पर्यंत धुळीचे प्रमाण सुरक्षित मानले जाते. शहरातील राजवाडा चौक, उद्योग भवन आणि कुपवाड शहरामध्ये दोन महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसारे हे प्रमाण तब्बल २२९ मायकोग्रॅमपर्यंत पोचल्याची नोंद आहे. काही दिवस १९४, १९६, १७४ असे प्रमाण नोंदवले गेले आहे. हवेतील धुळीचे हे वाढते प्रमाण आरोग्यास धोकादायक आहे.

धुळीमुळे वाढणारा दुसरा गंभीर विकार म्हणजे आयएलडी अर्थात इंटरस्टीशियल लंग डिसीज. स्पंजासारखे असणारे फुफ्फुस या विकारात जागोजागी बत्ताशासारखे होते. या विकाराचे लवकर निदान झाले नाही तर अशा रुग्णांना आयुष्यभर कृत्रिमरीत्या ऑक्‍सिजन सिलिंडरमधून द्यावा लागतो. त्यामुळे त्यांचे आयुष्य अल्पजिवी ठरते. या दोन गंभीर श्‍वसन विकारांचे कारण वायू प्रदूषण आहे. त्यावर सार्वत्रिक उपाययोजनाच केल्या पाहिजेत. 

प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
रस्त्यांवरच्या धुळीपासून मुक्तीसाठी स्त्यावर जाऊच नये हा उपाय शक्‍य नाही. मात्र काही उपाय शक्‍य आहेत. महिलांप्रमाणेच पुरुषांनीही तोंडाला स्कार्फ बांधावा. डोळ्यावर गॉगल घालावा. प्रवास कमी करावा. महत्वाचे म्हणजे धूर ओकणाऱ्या गाडीच्या मागे जाणे टाळावे. दहा वर्षांनंतरच्या सर्व गाड्या नियमानुसार भंगार कराव्यात.ा अशा गाड्यांना कॅटॅलायझर लावावा. धूळ कमी होण्यास आता सामुहिक उठावाची गरज आहे.

Web Title: Dr. Anil Madake article