
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
पुणे : बाबा भिडे पुल म्हणजे भंगार टाकण्याचा डेपो बनला आहे. या पुलावर कचरा, राडारोडा, बेवारस वाहने, मेट्रोचे साहित्य भंगारात पडलेले दिसते. परंतु आता महापालिका प्रशासनाने या पुलावर विद्युत खांब ठेवल्याचे दिसून येत आहेत. असा प्रकारे रस्त्यावर, फुटपाथवर अनेक दिवसांपासून पडुन आहेत.
विकासाच्या नावाखाली निधी वाया घालून शेवटी विद्युत खांब भंगारात. असा विकास वारंवार विद्युतपोल बदलून करताना दिसतो. परंतू यातून एकच उद्दिष्ट साध्य होताना दिसते आणि ते म्हणजे चिरीमिरी! विद्युत खांबावरील दिवे मात्र नेहमी बंद असतात. नागरिकांना व वाहनचालकांना मात्र रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.