कोथरूडमध्ये दिशादर्शक फलकावर अतिक्रमण

शिवाजी पठारे
Sunday, 13 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

कोथरूड : कर्वे रस्त्यावर मृत्युंजय मंदीर चौकात महापालिकेने मोठा खर्च करून नागरिकांच्या सोईसाठी दिशा दर्शक फलक उभारला आहे. परंतू हा फलक कायम राजकीय पक्षांच्या विनापरवाना जाहिरातींनी झाकलेला असतो. ही १ जानेवारीची वाढदिवसाची जाहिरात अद्यापही काढलेली नाही. सार्वजनिक मालमत्तेचा वापर खाजगी कारणासाठी होत असताना  प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना याची खंत आहे. उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असतांनाही प्रशासन न्यायालयाचेही आदेश पाळत नाही.म तदारांनी कोणत्या प्रकारचे लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे हे ठरविण्याची वेळ आली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment on directional panel in Kothrud