पुणे(कोंढवा खुर्द)- रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई कधी? 

गणेश कांबळे
गुरुवार, 4 जानेवारी 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- कोंढवा खुर्द या ठिकाणी कोढवा कात्रज रोडवर कोणार्कपुरम बिल्डींगच्या गेटनजीक या ठिकाणचे मासे विक्रेते माश्यांची घाण या ठिकाणी असणाऱ्या रस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकतात.

या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील भाजीपाला, प्लास्टीक पिशव्या तसेच सडलेल्या अन्न पदार्थांमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते येथील नागरिकांना या ठिकाणाहून जाताना तोंडाला रुमाल धरावा लागतो. या ठिकाणी सातत्याने कचऱ्याचे ढिगारे साचले जातात सरकार ठिक-ठिकाणी भारत स्वच्छ मोहिम राबवत आहे परंतु या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यावर मनपा कारवाई कधी करणार? 

Web Title: Esakal Citizen Journalism Ganesh kamble pune kondhawa

टॅग्स