पुणे | मेट्रोमुळे बदलणाऱ्या वाहतुक व्यवस्थेचा आराखडा नागरिकांना मिळावा

मेघना कुलकर्णी
बुधवार, 31 जानेवारी 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- सध्या पुण्यात मेट्रोबद्दल चर्चा आहे काही ठिकाणी काम चालू झाल्याचे समजले. मेट्रोचे मार्ग, कामांचे टप्पे, त्यावेळची वाहतूक, बदललेली सद्य पार्किंगची व्यवस्था तसेच नंतर होणारी स्थानके, नियोजित पार्किंग(प्रवाशांच्या वाहनांसाठी) व्यवस्था काय असेल याचा आराखडा नागरिकांसमोर आला पाहिजे.

तसेच ‘सकाळ’ने यासाठी—“पुणे मेट्रो मंच” अशी वाचकांची चर्चा घडवून आणावी ही विनंती कारण पुढील निदान ५० वर्षांसाठी जरी ही सुविधा अपेक्षित असेल आणि लोकांची मतमतांतरे काही सुचना यासाठी नक्कीच कामी येतील असे वाटते.

 

Web Title: Esakal Citizen Journalism Pune metro work traffic