आज मदर्स डे.. 

सुनेत्रा विजय जोशी
रविवार, 13 मे 2018

आपल स्टेटस कितीही वाढले तरी ते आईवडिलांनी शिकवल्यामुळे वाढलय हे लक्षात असु दे. त्यांची ओळख करुन देताना किंवा बाहेर जाताना लाज वाटण्याची काही गरज नाही. योग्य वेळी या गोष्टी केल्या तर रोजचाच डे हा मदर्स डे होईल यात शंका नाही.... 

मोबाईल फेसबुक आईच्या महतीचे गोडवे गावुन गावुन भरून ओसंडून वाहतील. आई किती महान तिच्याशिवाय जगणे म्रुत्युसमान वगैरे. आईच्या गळ्यात हात घालुन फोटो. 
पण मग असे चित्र जर खरे म्हणावे तर वृद्धाश्रम का ओसंडून वाहतात.? 

तेव्हा वास्तव आणि आभासी जग यात खुप फरक आहे. आईला इतरांसमोर मान देऊन नंतर तिच्याकडे दुर्लक्ष करणारेच जास्त आहेत. आणि ती वर गेलेली असेल तर मग तिच्यावर प्रेम जरा जास्तच उफाळून येते. 

त्यापेक्षा रोजच्या जीवनात तिला हवा तेव्हा आधार द्या. जास्त नाही पण तिच्या गरजेच्या वस्तू औषध पाणी वगैरे. आणि हो खुप नाही पण दिवसातला पाचच मिनिटे वेळ तिला म्हणजे आईवडिलांना दिलात तरी पुष्कळ आहे.. मुख्य म्हणजे मान नाही देता आला तरी तिच्यावर ओरडुन अपमान तरी करू नका. 

आपल स्टेटस कितीही वाढले तरी ते आईवडिलांनी शिकवल्यामुळे वाढलय हे लक्षात असु दे. त्यांची ओळख करुन देताना किंवा बाहेर जाताना लाज वाटण्याची काही गरज नाही. योग्य वेळी या गोष्टी केल्या तर रोजचाच डे हा मदर्स डे होईल यात शंका नाही.... 

सदैव जपते जी अपुले हित अहित
त्या माऊलीस आपण धरतो गृहित... 
संगोपन जी अपुले करते
चिऊकाऊचा घास भरविते
पण ती केव्हा काही का खाते? 
नसते आपणास कधी ते माहित.... 1

हुशार असो वा कमी गुणाचे
अपंग वा लुळे वा रंगरुपाचे
अपुला स्विकार ती करते
बर्‍या वाईट अपुल्या गुणांसहित... 2

तिला न ठाऊक नफा नुकसान
तिला न वाटे कधी अपमान
सुखात असावे मुल आपुले
इतकेच असते ठाऊक राहीत....3

कितीही मोठे होते आपण
तिच्यासाठी ते मुल लहान 
नाही कुणी तिच्याहुन महान
परमेश्वरही तिजसमोर पराजित.. 4

सदैव पाठीशी उभी तू राही
करू शकते मग मी काहीही
मायेस तुझ्या गे उपमा नाही 
खरेच सागते ना उगाच लिहीत.. 5

शब्द काव्य हे तुजला अर्पित...... 
आई तुझ्यासाठी... 
माझीच एक कविता तुझ्या साठी
यातच बांधल्या जन्माच्या गाठी. 

Web Title: Esakal Citizen Journalism Sunetra Vijay Joshi article