वडाची पुजा.. विश्वासाची पुजा

सुनेत्रा विजय जोशी
बुधवार, 27 जून 2018

वटपौर्णिमा.. एक हिंदु परंपरेतला विश्वासाचा सण. आजकाल वटपौर्णिमा म्हणजे नवीन पिढीला थोडा थट्टेचाच विषय झाला आहे. खरे तर नवरा बायकोच्या प्रेमाचा, एकमेकांवरील विश्वासाचा हा "व्हॅलेंटाइन डे" म्हणावा असा दिवस. 

या दिवशी पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि हाच पती प्रत्येक जन्मात मिळावा अशी कामना करते. मग नवर्‍यावरही बायकोशी एकनिष्ठ आणि चांगल्या वागण्याची जबाबदारी पर्यायाने येतेच. एकमेकांना प्रेमाच्या धाग्याने बांधुन ठेवण्याचा हा दिवस. 

वटपौर्णिमा.. एक हिंदु परंपरेतला विश्वासाचा सण. आजकाल वटपौर्णिमा म्हणजे नवीन पिढीला थोडा थट्टेचाच विषय झाला आहे. खरे तर नवरा बायकोच्या प्रेमाचा, एकमेकांवरील विश्वासाचा हा "व्हॅलेंटाइन डे" म्हणावा असा दिवस. 

या दिवशी पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि हाच पती प्रत्येक जन्मात मिळावा अशी कामना करते. मग नवर्‍यावरही बायकोशी एकनिष्ठ आणि चांगल्या वागण्याची जबाबदारी पर्यायाने येतेच. एकमेकांना प्रेमाच्या धाग्याने बांधुन ठेवण्याचा हा दिवस. 

या दिवशी वडाची पुजा करतात व त्याला धाग्याने बांधतात. उपवासही करतात. कारण याच वडाखाली सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले अशी आख्यायिका पुराणात वाचायला मिळते. वटवृक्ष हा मुळापासून ते पारंब्या पर्यंत औषधी गुणांनी युक्त आहे. त्यामुळे कदाचित जेव्हा पुराणातील सत्यवान मुर्छीत पडले असतील तेव्हा सावित्रीने या झाडाच्या औषधी उपयोगाने त्याचे प्राण वाचवले असणार. या झाडातुन निघणारा वायु व आसपासचे वातावरण शुद्ध असल्याने त्याचा उपयोग सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी उपयोगी झाले असणार. साहजिकच मग सावित्रीने त्या झाडाचे आभार पुजा करून मानले असणार. आणि मग तिथुनच वडाची पुजा करण्याची प्रथा पडली असावी. 

आपले पुर्वज प्रतिकात्मक म्हणुन मग त्याची पुजा करत असावेत. तसेही वृक्ष हे सत्पुरूष असतात. ते संपुर्ण जीवन इतरांसाठी जगतात. फळे फुले देतात. तसेच शीतल छाया पण. त्यांनी सोडलेला प्राणवायू वातावरणातले प्रदुषण कमी करतो. तसेच वड बहुगुणी असुन अनेक वर्षे जगतो त्यामुळे आपण दीर्घायुष्यासाठी त्याला वंदन करतो. 

त्या वटवृक्षाप्रमाणे पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणुन बायका त्याची पुजा बांधतात. पुर्वी बायकांचे जीवन त्यातील सुखदुःख हे पुर्णपणे पतीवर अवलंबून असल्याने हे व्रत बायकांनी करण्याची पद्धत पडली असावी. 

ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी निदान इतरांच्या भावनांची खिल्ली उडवू नये. शेवटी या विश्वात सगळ्या गोष्टी विश्वासावरच चालतात. आपल्या धर्माचा त्यातील परंपरांचा आदर करता येत नसेल तर अनादर तरी करू नये. 

उलट पुरूषांनीही जीवनावश्यक असणाऱ्या वृक्षाची पुजा करावी. पण काही बायका वडाच्या झाडाच्या फांद्या तोडुन घरी आणुन त्याची पुजा करतात ते मात्र बरोबर नाही. जिथे झाड असेल तिथे जाऊन पुजा करावी. अन्यथा वृक्ष तोडून पुजा करून काय उपयोग. तोडून फांदी आणण्यापेक्षा जो वृक्ष असेल त्याची पुजा केली तर निदान वृक्ष पुजेचा तरी लाभ होईल. वृक्षतोड करण्यापेक्षा एखादे झाड लावुन वृक्ष संवर्धन तरी करावे. 

अजुन एक महत्वाचे म्हणजे आपल्या साठी कुणीतरी म्हणजे आपली बायको हे करुन आपल्या साठी आयुरारोग्य आणि जन्मोजन्मी आपली साथ इच्छीत असेल तर ते त्या पुरुषाला सुखावणारे नक्कीच आहे. त्यामुळे नात्याचे आणि विश्वासाचे बंध घट्ट होण्यास मदत होते हे देखील खरे. 

वृक्षाची पुजा करायची तर
शतायुषी वडाची करा
वडाला धाग्याने बांधुन 
नात्यात प्रेमाचे रंग भरा. 

वडाची पुजा म्हणजे एकमेकांवर असलेल्या विश्वासाची पुजा. 
 नात्याच्या आदराची पुजा आणि बंध आजन्म टिकावे म्हणुन प्रार्थना. 

Web Title: Esakal Citizen Journalism Sunetra Vijay Joshi article