यशोदीप विद्यालयात निरोप समारंभ 

सकाळ संवाद
Sunday, 23 February 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

यशोदीप विद्यालयात निरोप समारंभ 
वारजे माळवाडी : जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त, कष्ट व वेळेचे नियोजन गरजेचे असते, असे प्रतिपादन महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांनी केले. 
यशोदीप माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित शुभेच्छा समारंभात त्या बोलत होत्या. 
वाघ म्हणाल्या, ""शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होत असतात. त्यांचा सर्वांना आयुष्यात खूप उपयोग होतो. आपण सुशिक्षित होत असताना सुसंस्कारित होणेही महत्त्वाचे असते.'' या वेळी वेणूताई चव्हाण पॉलिटेक्‍निक कॉलेजच्या प्राध्यापिका सुनेत्रा पवार यांनी उत्तरपत्रिका कशी लिहावी तसेच वेळेचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक रतन माळी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक व्यंकटेश देशमुख, मुख्याध्यापिका नीता गुंजिकर, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका आसावरी मुजुमदार उपस्थित होते. सूत्रसंचालन मीरा कुंभारीकर यांनी केले, तर आभार समीर गायकवाड यांनी मानले. 
- व्यंकटेश देशमुख 

प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक 5 येथे खड्डा 

प्रभात रस्ता : गल्ली क्रमांक पाचच्या रॅम्प वर गेले दोन महिने झाले मोठा खड्डा पडला आहे. अनेक जण यावरून घसरून पडले आहेत. या खड्डा बुजविण्यासाठी संबंधित नगरसेवकांना अनेक वेळा विनंती केली आहे. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. 
- भूषण बोधानी 

सकाळ संवादला शुभेच्छा 

पुणे : सकाळ संवाद ही खूप छान कल्पना असून, त्यामुळे सर्व सामान्य नागरिकदेखील त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी व समस्या प्रभावीपणे न घाबरता मांडू शकतात. यामुळे सकाळ संवादला खूप खूप शुभेच्छा. 
- डी एल मुळे 

कॅनॉल रस्ते दुहेरी करावे 
सिंहगड रस्ता : सिंहगड रस्त्यावरील चौकाचौकात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. येथे वाहतूक पोलिसही नसतात. तसेच कॅनॉल रस्त्यावरही कोंडी होत आहे. यातून सुटका करायची असल्यास कॅनॉलचे रस्ते दुहेरी करावे. 
- सतीश कदम 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farewell ceremony at Yashodip School