esakal | खडकवासला येथील शेतकरी वंचित 
sakal

बोलून बातमी शोधा

खडकवासला येथील शेतकरी वंचित 

खडकवासला येथील शेतकरी वंचित 

sakal_logo
By
विजय मते

पुणे : खडकवासला गावातील तलाठी कार्यालयांच्या भोंगळ कारभारामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमधील खरे गरजू शेतकरी वंचित राहत आहेत. ज्यांना या योजनेची गरज नाही अशा लोकांची खोटी माहिती देऊन तलाठी कार्यालयाने त्यांना लाभार्थी ठरवून शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. हे प्रकरण तलाठी कार्यालयांचा तसेच महसूल विभागाचा भ्रष्टाचार उघडकीस आणणारे आहे. या प्रकरणाची त्वरित चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. महसूल विभाग याकडे लक्ष देईल हीच अपेक्षा !