अॉनलाईन भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा बंद

अनिकेत खराडे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : पोलिसांनी गेल्या वर्षी सुरु केलेली घर बसल्या घर मालकांना अॉनलाईन  भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा गेल्या २ आठवड्यांपासून बंद आहे. आधीच  या सुविधेबद्दल प्रचंड तक्रारीं अनेक लोकांनी केल्या आहेत. रिअल इस्टेट असोसिएशनने पुणे पोलिस आयुक्तालयात त्या सुविधेबद्दल शंका उपस्थित केली असता, तेथील पोलिसांना सुद्धा आॅनलाईन सिस्टिम बाबतची माहिती नाही. ही सिस्टिम वापरण्याच्या पध्दत सुद्धा त्यांना सांगता येत नाही. 

तसेच ही सुविधा आॅनलाईन असताना आॅनलाईन फाॅर्म भरल्यावर त्याची प्रिंटआउट काढून तो फाॅर्म पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये  जमा करावा लागतो. त्यांवर पोलिस स्टेशनचा शिक्का घ्यावा लागतो. या शिक्का  देण्यासाठी घरमालक व भाडेकरुंकडून पोलिस १०० रुपये आकरतात.  

ही सिस्टिम १० अॉगस्ट ला चालू होणार होती. पण अजूनही ही वेबसाईट सुरु झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांची पोलिस व्हेरिफिकेशन अभावी अनेक कामे अडलेली आहेत. तरी महापालिकेने याची दखल घ्यावी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: filling information for online rentals is closed