esakal | वर्तकबागे समोरील स्टीलचे चार खांब गायब
sakal

बोलून बातमी शोधा

PNE18O23806.jpg

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

वर्तकबागे समोरील स्टीलचे चार खांब गायब

sakal_logo
By
अनिल आगावने

शनिवार पेठ :  येथील डॉ. वा. द. वर्तक(वनस्पतीशास्त्रज्ञ) उद्यानामध्ये नागरिकांना बागेत ये-जा करण्याकरिता कोणतीही अडचण येऊ नये. तसेच दुचाकी वाहनचालक प्रवेश द्वाराजवळ दुचाकी पार्क करत असल्यामुळे या ठिकाणी नुकतेच स्टीलचे खांब बसविण्यात आले होते. परंतु हे खांब नीट बसविण्यात आले नसल्यामुळे ते हालत होते. ज्यावेळी हे खांब बसविले होते त्याची संख्या बारा होती. परंतु आता चार खांब गायब झाले आहेत. याला जबाबदार कोणाला धरायचे? कारवाई कोणावर केली पाहिजे? हे खांब बसविण्यासाठी नागरिकांच्या कष्टाचा व घामाचा कररूपाने गोळा केलेल्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा विकास कामांचा माध्यमातून सातत्याने होताना दिसत आहे.


 

loading image