आंबेगाव खुर्दमध्ये श्रींच्या आगमनाची लगबग 

- चंद्रकांत गुरव 
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : श्रावण सुरू झाला की सणवार सुरू होतात. नुकतीच नागपंचमी झाली आणि आता वेध अवघ्या काही दिवसांवर आलेल्या लाडक्‍या गणरायाच्या आगमनाचे. आंबेगाव खुर्द येथे गणपतींच्या मूर्तींचे आगमन झाले आहे. जांभूळवाडी रस्त्यावर समर्थ सदन, मोडक वस्ती, लिपाणे वस्ती येथे मूर्त्यांचे स्टॉल लावण्यात आले आहे. दगडूशेठ, लालबागचा राजा, मुकुट व फेटेवाले अशा विविध सुंदर आकर्षक मूर्ती लक्ष वेधून घेत आहेत. किमती अंदाजे रुपये 220 पासून ते अडीच हजारांपर्यंत आहेत. मागील वर्षीपेक्षा या वर्षी 10 ते 15 टक्के किमती वाढल्या आहेत असे दिसते. नागरिकांची गणेशमूर्ती बुकिंग करण्याची लगबग सुरू झाली असून, पर्यावरणाचा विचार करून इकोफ्रेंडली मखर घेण्याकडे भाविकांचा कल आहे. तसेच विविध प्रकारच्या लाइटच्या माळा, रंगीबेरंगी बल्ब, सजावटीच्या आकर्षक वस्तू खरेदीलासुद्धा वेग आला आहे. तसेच आसमंत, सद्‌गुरू हाइट्‌स, सप्तगिरी, गुरुकृपा हाइट्‌स, विवा सरोवर, थोरात बाग, साईवॉटर क्रेस्ट, साई सरोवर, लेकशोर या विविध सोसायट्यांमध्ये गणरायाच्या आगमनाच्या तयारी संबंधी पदाधिकारी, रहिवाशांच्या बैठकासुद्धा संपन्न झाल्या आहेत. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Idols In Market