पाऊणजाई मंदिराशेजारी राडारोडा 

सकाळ संवाद
Monday, 3 February 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पाऊणजाई मंदिराशेजारी राडारोडा 
वडगाव बुद्रुक :  येथील पाऊणजाई मंदिराशेजारील सोसायटीच्या आवारातील झाडे कापून त्याच्या फांद्या बाजूच्या ओढ्यामध्ये टाकून दिल्या आहेत. महापालिका 
कर्मचारी सतत या भागात कार्यरत असतानादेखील ही बाब त्यांच्या निदर्शनास येऊनदेखील काहीच कारवाई का करण्यात आली नाही.? संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित 
लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी. 
- मंदार मोरे 

पोलिसांची सेवा आठ तासांची असावी 
पुणे :  पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी खूप प्रामाणिकपणे काम करतात. त्यांना कोणताच सण आपल्या कुटुंबासमवेत साजरा करता येत नाही. त्यांना 
24 तास सतर्क राहावे लागते. मी पोलिस पाटील झाल्यापासून माझा उत्तमनगर पोलिस ठाणे आणि पुणे शहर पोलिसांबरोबर जास्त 
संबंध आला आहे. माझ्या मनामध्ये पुणे शहर आणि पुणे ग्रामीण अशा दोन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांबद्दल खूप आदर आहे. पुणे शहर पोलिसांनी महिलांसाठी दामिनी 
पथक, बडिकॉप, ज्येष्ठांसाठी आणि लहान मुलांसाठी भरोसा, पोलिस काका वाहतुकीसाठी वाहतूक क्‍लब तसेच सतर्क पुणेकर अशा बऱ्याच सेवा चालू 
केल्या आहेत. पोलिसांमुळे जनता सुरक्षित आहे; पण पोलिसच असुरक्षित आहेत. 
- दत्ता पायगुडे 
 

दुभाजकांना रंग देण्याची आवश्‍यकता 
पुणे : शहरातील बहुतांश रस्ते दुभाजकांना पांढरा रंग अथवा परावर्तिय सूचक रंगयोजना नाही. सूर्यास्तानंतर असे रंग नसलेले दुभाजक समोरून व बाजूने दिसून येत 
नाहीत. वाहनांचे नुकसान, अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व दुभाजकांची त्वरित रंगसफेदी करावी. 
- सुधीर तारू 

फास्टॅगचा असाही फटका 
पुणे :  मी 25 जानेवारीला सायंकाळी पावणेसहा वाजता पाताळगंगाहून पुण्याला येताना द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाक्‍यावर 173 रुपये देऊन टोल 
भरला व पावती घेतली. तळेगाव टोलनाक्‍यावर साधारण सायंकाळी साडेसहा वाजता माझी गाडी पास झाली. तिथे ही पावती दाखवली आणि गाडी तिथून पुढे निघाली; 
फास्टॅगकरिता काही दिवसांपूर्वी मी अर्ज केला होता व त्याप्रमाणे फास्टॅग नुकताच माझ्या घरी कुरिअरने पोचला होता; परंतु अद्याप मी तो गाडीवर लावलेला नाही 
तरीदेखील तळेगाव टोलनाक्‍यावरून माझी गाडी पास होताना माझ्या फास्टॅगच्या बॅंक अकाउंटमधून 173 रुपये वजा झाले व तसा माझ्या बॅंकेचा संदेश मला 
आला. थोडक्‍यात काय खालापूर ते पुणे या प्रवासाकरिता दुप्पट टोल वसूल केला गेला. याची दाद कोणाकडे मागायची आणि जे दुप्पट पैसे गेले ते कोणाकडून परत 
मिळवायचे? कोणाला अधिक माहिती असल्यास कृपया मार्गदर्शन करावे. 
- विनायक काळे 

 

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage near the Paunjai Temple