कचरा गाडीचे टायर, बॅटरी चोरले 

विजय मते
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : खडकवासला गावातील कचरा गाडीचे चारही टायर व बॅटरी रात्रीत चोरी करण्यात आले. कचरा गाडी गावामधील कालव्यांच्या बाजुला उभी केली जाते. त्यांचाच फायदा चोरांनी घेतला. या चोरीच्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अशा घटना पुढे होऊ नये यासाठी चोरांना पोलिसांनी चांगला धडा शिकवला पाहिजे. तसेच कचरा गाडीची दुरवस्था झाल्यामुळे कचरा संकलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उघड्यावर कचरा टाकला जाणारा कचऱ्यामुळे रोगराईचा धोका निर्माण होऊ शकतो. तरी पुणे महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage vehicles tires, battery stolen