
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
हडपसर : चंद्रमौळीश्वर मंदिरासमोर काही महिन्यांपूर्वीच उड्डाण पुलाखाली वटवृक्षाची अतिशय छान कलाकृती साकारण्यात आली आहे. नावीन्यपूर्ण अशीही कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेते. काही दिवसांपूर्वी त्याचे उद्घाटनही झाले. अशा सुंदर कलाकृतीसमोर फलक लावल्यामुळे त्याची शोभा कमी झाली आहे. भाजपद्वारे दिवाळीनिमित्त शुभेच्छा देणारा फलक येथे लावला आहे. तरी हा फलक तातडीने हटवावा. प्रशासनाने अशा कलाकृतींसाठी खर्च केलेला पैसा, श्रम असा वाया घालवू नये.