धायरी नऱ्हे रस्त्यावरील समस्यांकडे दुर्लक्ष 

सचिन जाधव 
Tuesday, 8 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

धायरी : धायरी नऱ्हे रस्त्यावरील समस्यांबाबत पीएमसी ऍपवर वारंवार तक्रार दाखल केली आहे. तरी अदयाप समस्या सोडवली जात नाही. पीएमसी ऍपवर दाखल केलेली तक्रार समस्या न सोडवताच बंद केली जाते. नऊ वेळा तक्रार दाखल करुन देखील एकदाही समस्या सोडवली नाही. पीएमसी ऍपवर ऑनलाईन तक्रार दाखल करण्याचा नागरिकांना काही फायदा होत नाही. ते फक्त सिस्टीमवर तक्रार सोडवली असे दाखवून समस्या बंद करतात. धायरी रस्त्याची साफसफाई, खड्डे, तुटलेले रिफलेक्‍टर अशा कित्येक समस्या सोडविल्याच नाही. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. पीएमसी ऍप बंद करा अथवा कामकाज पध्दत सुधारा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ignorance towards the problems on Dhyari Narhe road