मयूर कॉलनीत बेकायदा फलक 

शिवाजी पठारे 
Friday, 27 December 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

 पुणे : कर्वे रस्त्यावर मयूर कॉलनीत विजेच्या खांबावर लावलेले हे जाहिरातीचे अनधिकृत फलक. शहरात जागोजागी असे खासगी अनधिकृत फलक लावलेले आढळतात. वाढदिवस, अभिनंदनाच्या जाहिरातींच्या अशा फलकांमुळे शहर विद्रूप होत आहे. याची प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना कोणतीही खंत नाही. महापालिकेचा आकाशचिन्ह विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. उच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल देऊनही अंमलबजावणी होत नाही. कोणीही उठतो आणि प्रसिद्धीसाठी अथवा निष्ठा दाखविण्यासाठी आपला मोठा फोटो लावून फलक लावतो. हा न्यायालयाचा स्पष्टपणे अवमान असतानाही कोणतीही कारवाई होत नाही. महापालिकेने तातडीने पाहणी करून याबाबत ठोस भूमिका घेतली, तरच याला पायबंद बसेल. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal poster in Mayur colony in pune