दिव्यांगांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी करा 

सुनील शिंदे 
Thursday, 12 December 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : केंद्र सरकारने दिव्यांगांना दिलेली ओळखपत्रे सर्व ठिकाणी ग्राह्य धरली पाहिजेत. दिव्यांगाचे प्रश्न सोडविण्यासाठी दिव्यांग आयोगाची आवश्‍यकता आहे. दिव्यांगांचे पुनर्वसन होण्यासाठी शासन स्तरावर प्रभावीपणे अमलबजावणी व्हायला हवी. 
राज्याच्या अर्थसंकल्पात नवीन योजनांचा समावेश करण्यासाठी वेळोवेळी आवाज उठवला जातो; पण त्यांची हवी तशी अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे दिव्यांगांना त्यांच्या न्यायहक्कासाठी वारंवार आंदोलने व निदर्शने करावी लागतात. इतर विद्यार्थ्यांसारखी दिव्यांग कर्णबधिर, मूकबधिर विद्यार्थ्यांना गरजेनुसार पदवीनंतर शिक्षणाची सोय उपलब्ध नाही. आजही दिव्यांगांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाहीत. दिव्यांगांचे सात प्रकार होते. आता त्याचे प्रकार वाढवून ऐकवीस झाले. त्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी सहा महिने लागत आहेत. आरक्षणाची टक्केवारी तीन होती आता ऐकवीस प्रकाराच्या दिव्यांगांची टक्केवारी वाढल्याने आरक्षण फक्त एक टक्‍क्‍याने वाढले आहे. दिव्यांगांना कायमस्वरूपी औषधोपचार, व्यावसायिक गाळे, प्रत्येक तालुका स्तरावर दिव्यांग भवन झाले पाहिजे, यांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. ग्रामपंचायत ते लोकसभेला दिव्यांगांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, म्हणजे त्यांना न्याय मिळेल. 
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Implement the plans for the disabled