धायरीत रस्ता रुंदीकरणाचे काम अर्धवट

संदीप दिलीप काळे
Friday, 8 February 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

 

धायरी : मराठा मावळा संघटनेने धायरी ग्रामस्थांना घेऊन केलेल्या आंदोलनामुळे रुंदीकरणाचे काम सुरु झाले. परंतु महापालिकेच्या ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभारामुळे जनतेच्या पैशांची उधळण चालली आहे. धायरी फाटा ते धायरी गाव या 4 किमी रस्त्याचे रुंदीकरण असताना प्रशासनाने फक्त ठराविक ठिकाणाचे अपूर्ण रुंदीकरण करून दिखावा करत आहे. 

रुंदीकरण करताना विजेचे खांब तसेच ठेऊन रुंदीकारणास सुरुवात केल्यामुळे अपघाताला प्रशासन निमंत्रण देत आहे. त्यात अर्धवट रुंदीकरण करून अनधिकृत फेरीवाले आणि बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांनाचे फावले आहे.  या रस्त्यावर जागो जागी खड्डे पडले असताना साईडपट्टीचे काम अर्धवट रुंदीकरण केले आहे. तरी रस्त्याचे नियोजित रित्या रुंदीकरण करून, अतिक्रमण हटवून, संपूर्ण रस्ता डांबरीकरण करण्यात यावा. नाहीतर पुन्हा एकदा मराठा मावळा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Incomplete work of Dhayari road expatiation