भिडे पुलावर लोखंडी कठडे आवश्यक 

- अनिल अगावणे 
Wednesday, 28 August 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे :  दरवर्षी पावसाळ्यात खडकवासला धरणातून पाणी सोडले की प्रथम बाबा भिडे पूल पाण्याखाली जातो आणि मग नागरिक नदीला आलेला पूर पाहण्यासाठी भिडे पूल, झेड ब्रिज, महर्षी शिंदे पुलावर गर्दी करतात आणि मग जो-तो हातात मोबाईल घेऊन सेल्फी काढण्यात दंग होतो. अशावेळी हौशे-नौशे हा विचार करीत नाहीत की सेल्फी कोठे काढतो आहोत? त्यात दरवर्षी भिडे पुलाचे कठडे वाहून जातात. नुकताच गाडगीळ पुलाचा (झेड ब्रिज) कठडा ढासळला होता. परंतु, प्रशासनाने ताबडतोब त्या ठिकाणी मजबूत लोखंडी कठडा बसवला आहे. पण, भिडे पुलाला मात्र मजबूत लोखंडी कठडा बसवला जात नाही. ही खरी शोकांतिका आहे आणि संशोधनाचा पण विषय आहे. त्यात या ठिकाणी महामेट्रोचे काम सुरू आहे. शिवाय, बाहेरील लोंढे येऊन त्या ठिकाणी वस्ती करीत आहेत. त्यात या वस्तीमधील जवळ जवळ एक वर्षापासून पाच वर्षांपर्यंतची मुले या नदीपात्रात मनसोक्त खेळत असतात. त्यामुळे कधीही अनुचित प्रकार घडू शकतो. अनेक वेळा अनुचित प्रकार घडलेदेखील आहेत. तरीही, प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे भिडे पुलाला कायमस्वरूपी मजबूत लोखंडी संरक्षक कठडा बसवावा. त्यावर एकदाच खर्च करा आणि पाच-दहा वर्षे तुटणार नाही, याची खात्री त्या ठेकेदाराकडून किंवा कारागिराकडून प्रशासनाने घ्यावी. संरक्षक कठडा बसविण्यातच सर्वसामान्य नागरिकांचा कररूपी पैसा पाण्यात घालू नका. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iron rods needed on the Bhide Bridge