आयएसआय हेल्मेट खुप गरजेचे

गणेश काळे
Monday, 14 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : आयएसआय मार्क हेल्मेट गरजेचा आहे. काही दिवसांपूर्वी गाडीवरुन जाताना पावसामुळे रेनकोट घालायला गाडी बाजुला घेतली. त्याचवेळी मागच्या गल्लीत दोन गटात मारामारी सुरु झाली. १२-१५ मुले स्टंप-बॅट वगैरे होते. त्यातील एकाने एक मोठा दगड दुसऱ्या मुलांना मारण्यासाठी भिरकवला. तो त्यांना कोणाला न लागता माझ्या डोक्यावर पाठीमाघुन जोरात आदळला. एवढा फटका जोरात होता की त्या फटक्याने मी अर्धा वाकलो. परंतु माझे नशिब चांगले होते त्यावेळेस माझ्या डोक्यावर चांगल्या दर्जाचे हेल्मेट होते. त्यामुळेच माझा जीव वाचला. सर्व दुचाकी चालकांना विनंती हेल्मेट घालुनच गाडी चालवा.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ISI Helmets need a lot