कॅन विक्रेत्यांवर नियंञण ठेवा

दत्ताञय फडतरे
शनिवार, 9 जून 2018

पुणे : जिल्ह्यातील निमशहरी तसेच ग्रामीण भागात शुद्ध व थंड पाण्याच्या कॅन विक्रेत्यांवर नियंञण ठेवणे आवश्यक आहे. विविध तालुक्यांमधील ग्रामीण भागात थंड व शुद्ध पाण्याचे कॅन विक्रीचा धंदा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

थंड व शुद्ध पाण्याचे कॅन किती रुपयाला विक्री केले जाते, शुध्द पाण्याची तपासणी कोणाकडुन होते, डिपॅाझिट किती घेतले जाते, त्यांची वाहतुक कशी केली जाते तसेच पुरवठा कोण करते याबाबतची अधिकृतपणे नोंद नसल्याचे पुढे येत आहे. या कॅन बहाद्दरांवर प्रशासनाचा धाक नसल्याने पाण्याचा धंदा तेजीत चालला असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाईलाजास्तव कॅनचे पाणी नागरिकांकडुन खरेदी होताना दिसुन येते याच नाईलाजाचा फायदा घेवुन पाणी पुरवठादार व प्लॅटकडुन नागरिकांचे आर्थिक शोषण होत असण्याचे प्रमाण वाढत आहे.

नागरिकांच्या आरोग्याच्या, आर्थिक शोषणांवर, तसेच शासकीय महसुल प्राप्तीसाठी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रशासन पातळीवर अन्न व औषध प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी, नगरपालिका यांनी यावर नियंञण ठेवणे आवश्यक आहे.
 
Web Title: keep control on can vendors