वर्षा सहलीसाठी कडक कायदे करावेत.

दत्तात्रय जाधव
सोमवार, 11 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे  : यंदा पावसाला वेळेत चांगली सुरुवात झालेली आहे.  मात्र आता सगळीकडे वर्षा सहलीना सुरूवात होईल. वर्षा सहलीला जाणारे लोक सामाजिक भान विसरून वाहतूक शिस्त कायदे नियम तोडून मद्यपान करून गाड्या भरधाव चालवून स्वतःच्या आणि इतरांच्या जिवीताला धोका निर्माण करतात.

काही ठिकाणी महिलांची छेडछाड मारामारी प्रसंगी जीवघेणे अपघात सुध्दा होतात. आता सरकारने याकडे लक्ष देऊन वर्षासहलीची ठिकाणे पर्यटनस्थळे म्हणून घोषित करून तेथे पार्किंग दवाखाने स्वच्छता गृहे प्रथमोपचार केंद्रे पोलीस बंदोबस्त निर्माण करून सरकारी तसेच खासगी वाहतूकीला काही अटी शर्तीनुसार परवानगी दिल्यास सुशिक्षीत बेरोजगारांना व्यवसाय धंदा मिळून सरकारला महसूली उत्पन्न मिळेल .
 

Web Title: Make strict laws for the rainy season trips