शनिवारवाड्यात अपघात टाळण्यासाठी माेबाईलवर बंदी घालावी 

- अनिल अगावणे 
Thursday, 28 November 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : शनिवारवाडा पाहण्यासाठी देश-विदेश तसेच ग्रामीण भागातून अनेक पर्यटक येतात. परंतु हे आलेले हौशी पर्यटक सेल्फी काढण्यात एवढे दंग असतात, की आपण कोठे सेल्फी काढतो याचे भानदेखील त्यांना राहत नाही. यावर्षी पावसाने कहरच केल्यामुळे शनिवारवाड्याच्या भिंतींवर हिरवळ व बांडगूळ वनस्पती आली आहे. त्यामुळे भिंती केव्हाही खचून पडू शकतात. अशा वेळेस शनिवारवाडा पाहण्यासाठी आलेले पर्यटक शनिवारवाड्याच्या भिंतींवर झाडाच्या फांद्या वरती धोकादायक पद्धतीने बसून; गप्पागोष्टी व सेल्फीचा आनंद घेतात. परंतु एखाद्या वेळेस अनुचित प्रकार घडून जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोणाला धरायचे? यासाठी पर्यटकांनीसुद्धा काळजी घेतली पाहिजे. सेल्फी व गप्पागोष्टी मारण्यासाठी योग्य अशी जागा शोधली पाहिजे. म्हणजे अनुचित प्रकार घडणार नाही. परंतु, आनंदाच्या क्षणी हा विचार त्यांच्या मनात येत नाही. यासाठी शनिवार वाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूमध्ये मोबाईलला बंदी करावी. तसेच कठड्यावर बसण्यास बंदी घालावी. व सुरक्षा रक्षक नेमावे. असे आदेश पुरातन खात्याने काढावे. अनुचित प्रकार घडण्याअगोदर सतर्कता बाळगलेली चांगली. याचा प्रामुख्याने विचार व्हावा. 
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mobile phones should be banned to shiwarwada