गायमुख चौकाजवळील  बेकायदा दुकाने 

सकाळ संवाद
Wednesday, 26 February 2020

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

गायमुख चौकाजवळील 
बेकायदा दुकाने 

आंबेगाव बुद्रुक : गायमुख चौकाजवळ नव्याने बांधलेल्या आरसीसीच्या तटबंदीजवळ बेकायदा दुकानांचे बांधकाम सुरू आहे. जर हे थांबविले नाही तर आणखी नवीन दुकाने बेकायदेशीर बांधली जातील. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल. त्यामुळे पालिका प्रशासानाने येथे पाहणी करून योग्य ती कारवाई करावी. 
-आसिफ पाचवडकर 

लक्ष्मी रोडवरील पादचारी 
मार्गाची रूंदी कमी करावी 

लक्ष्मी रोड : सोन्या मारुती चौक ते डेक्कन अल्का टॉकीज चौकापर्यंत दोन्ही बाजूला पदपथ सध्या 8 ते 10 फुटाचे आहेत. त्यामुळे वाहतुकीला रस्ता कमी पडत आहे. त्यामुळे पादचारी मार्ग 4 फुटाचे करावेत. येथील रस्त्यावर वाहने लावली जातात. त्यामुळे रस्ता आणखी कमी पडतो. यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे. तसेच अनेक कापड विक्रेते फुटपाथवरच कपडे विकत बसत असल्याने नागरिकांना पायी चालण्यास त्रास सहन करावा लागतो. संबंधित प्रशासनाने येथे त्वरित कार्रवाई करावी. 
- अस्लम खान 

लक्ष्मीनगर येथे घंटागाडी सुरू करावी 
पर्वती : लक्ष्मीनगर येथे कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. स्वच्छचे कर्मचारी कचरा जमा करण्यासाठी घरोघरी जातात. परंतु, दरमहा नेमके किती रुपये त्यांना द्यायचे? याबाबत अनेक नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे नागरिक या कर्मचाऱ्यांकडे कचरा देण्याचे टाळतात. त्यामुळे कचरा जमा करण्यासाठी येथे घंटागाडी पालिकेने उपलब्ध करून द्यावी. 
-गणेश वाघचौडे 
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Near gaimukh Chowk Illegal shops