तात्यासाहेब थोरात उद्यानात प्रशिक्षित सुरक्षारक्षक हवेत 

एक सजग नागरिक 
Wednesday, 18 December 2019

कोथरूड : कोथरूड येथील शिवाजी पुतळ्याजवळील तात्यासाहेब थोरात उद्यानात सुरक्षारक्षकांच्या हलगर्जीपणामुळे अनेक अपप्रकार घडत आहेत. इथे अनेक झोपडपट्टीमधील मुले लहान मुलांची खेळणी अडवून ठेवतात. लहान मुलांना शिवीगाळ करतात. अनेक टवाळखोर तरुण बागेत उघडपणे धूम्रपान-मद्यपान करतात. स्त्रिया-मुलींना व्यायाम करताना पाहून शेरेबाजी करत असतात. तसेच गंभीर बाब म्हणजे अनेक अल्पवयीन, तरुण मुले-मुली कमी उजेडाच्या ठिकाणी कोपऱ्यात लज्जास्पद प्रकार करत बसलेले असतात. अनेक वेळा तक्रारी करूनदेखील येथील सुरक्षारक्षक लक्ष देत नाहीत.

कोथरूड : कोथरूड येथील शिवाजी पुतळ्याजवळील तात्यासाहेब थोरात उद्यानात सुरक्षारक्षकांच्या हलगर्जीपणामुळे अनेक अपप्रकार घडत आहेत. इथे अनेक झोपडपट्टीमधील मुले लहान मुलांची खेळणी अडवून ठेवतात. लहान मुलांना शिवीगाळ करतात. अनेक टवाळखोर तरुण बागेत उघडपणे धूम्रपान-मद्यपान करतात. स्त्रिया-मुलींना व्यायाम करताना पाहून शेरेबाजी करत असतात. तसेच गंभीर बाब म्हणजे अनेक अल्पवयीन, तरुण मुले-मुली कमी उजेडाच्या ठिकाणी कोपऱ्यात लज्जास्पद प्रकार करत बसलेले असतात. अनेक वेळा तक्रारी करूनदेखील येथील सुरक्षारक्षक लक्ष देत नाहीत. उलट सुरक्षारक्षकदेखील आपल्या मित्रांबरोबर थापा मारत किंवा मोबाईलवर टाइमपास करत बसलेले असतात. इथे जवळपास 5-6 सुरक्षारक्षक आहेत; पण कोणीही जागेवर नसतात. कोथरूड परिसरात एवढे विस्तीर्ण उद्यान दुसरे नाही, ज्येष्ठ नागरिकांसाठी हे खूप मोठे ऊर्जा केंद्र आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about Tatyasheb Thorat Garden guards