नाईट स्ट्रीट न्युसन्स 

सुहास महाजन
Saturday, 24 November 2018

पुणे : पुण्यासारख्या मोठ्या सर्वच शहरांत वाढत्या लोकसंख्येमुळे गेली काही वर्षे 'नाईट स्ट्रीट न्युसन्स' म्हणजेच रात्री घरात झोपणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरील उपद्रवांमुळे होणारा त्रास प्रचंड प्रमाणात वाढत आहे. यामध्ये रात्री-अपरात्री भुंकणारी पाळीव व भटकी कुत्री, कायदा मोडून फटाके वाजवणारे, बड्या बापांची  झोपडपट्टीतील मोठा आवाज करणाऱ्या दुचाक्या, सायलेन्सर व हॉर्नमधे बदल करून दुचाक्या हाकणारे, रस्त्यावर वाढदिवस व इतर सर्व प्रकारचे सण, समारंभ साजरा करणारे असे अनेक घातक वर्ग मोडतात.

अनेक कायदे असुनही ते मोडणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने अशा समाजविघातक मंडळींना कोणाचेच भय राहीले नाही. यांमुळे झोपेसारखी मूलभूत गरज सुध्दा सामान्य जनतेला दुरापास्त झाली आहे. भारतात सामान्य जनतेच्या जीवनमानाला काहीच गुणवत्ता नाही!
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Night Street nuisance