मोठे फुटपाथ कशासाठी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

नगर रस्ता : येथे इनॉरबिट मॉलसमोरील सीटीआर मिलपासून पुढे चंदननगरपर्यंत सिमेंटचे ब्रिक्‍स टाकून नवीन फूटपाथ बांधण्याचे काम सुरू आहे, त्यासाठी चांगल्या स्थितीतील फुटपाथ पूर्णपणे उखडून टाकले जात आहेत. जुन्या फुटपाथची डागडुजी करूनही काम झाले असते. तसेच, हे नवीन फूटपाथ बांधताना जमिनीखालून जाणाऱ्या अनेक केबल्स तुटण्याची शक्‍यता असते, त्यामुळे हे काम पूर्ण होताच त्या केबल्स परत टाकण्यासाठी हे नवीन फूटपाथ परत उघडले जाऊ शकतात.

पालिकेची सायकल योजनाही फेल झाली आहे, तरी त्यासाठी फूटपाथशेजारी वेगळे सायकल ट्रॅक बांधायचे काम सुरूच आहे. पादचारी लोकांसाठी फूटपाथ गरजेचे आहेत. पाच- सहा फुटांचे फूटपाथ त्यासाठी पुरेसे आहेत. दहा, बारा, पंधरा फुटांचे फूटपाथ कशासाठी? 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no need of big sidewalk