अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा फक्त सांत्वनापुरताच 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 November 2019

पुणे : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भात व इतर पिकांची किरकटवाडी परिसरात अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून पुन्हा पाहणी करण्यात आली. याअगोदरही जिल्हाधिकाऱ्यांकडून या भागातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यात आली होती; परंतु शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अद्याप मदत मिळालेली नाही. अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा फक्त शेतकऱ्यांचे सांत्वन करण्यापुरताच होतोय की काय? असा प्रश्न आहे. 

ढगफुटीसारख्या पावसाने किरकटवाडी, नांदोशी, सणसनगर, खडकवासला या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्वतः या भागातील नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर कृषी अधिकारी व संबंधित कामगार तलाठ्यांमार्फत किरकटवाडी परिसरातील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते; परंतु शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला मिळालेला नाही. उरलेसुरले पीकही सततच्या पावसामुळे पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. केवळ पाहणी न करता ताबडतोब सरसकट शेतकऱ्यांना मदत मिळावी. नुकसान झाले की केवळ पंचनामे केले जातात; परंतु मदत मिळत नाही, अशी या भागातील शेतकऱ्यांची खंत आहे. 
नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी पंचायत समिती हवेलीच्या सभापती हेमलता काळोखे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, विस्तार अधिकारी अजित धोगटे, किरकटवाडीचे सरपंच गोकुळ करंजावणे, नांदोशी गावचे सरपंच राजाभाऊ वाटाणे, किरकटवाडीचे उपसरपंच नरेंद्र हगवणे, ग्रामपंचायत सदस्य किरण हागवणे, काजल हगवणे, नितीन हगवणे, पल्लवी रिंढे, शैला हागवणे, प्रशांत हगवणे, शेतकरी लहू हगवणे, किसन हगवणे, प्रभाकर हगवणे, कृष्णा हगवणे, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर वाघमारे, लिपिक सातपुते आदी अधिकारी व पदाधिकारी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officers' tour is just for comfort