केळकर संग्रहालय संवर्धनाकडे लक्ष द्या

अजित नाडगीर
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुण्याच्या एक मानबिंदु, राजा दिनकर केळकर संग्रहालय आहे. येथे संग्रहालय संवर्धनासाठी महापालिकेला काही बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. येथे बऱ्यापैकी परदेशी पर्यटकांचा वावर दिसतो. संग्रहालयात कर्मचारी आहेत, पण परदेशी पर्यटकांना मार्गदर्शन करणारे, स्थळाची माहिती, ऐतिहासिक माहिती सांगणारे कोणीही नाही. तसेच काही ठिकाणी भाषांतर चुकीचे केले आहे. तिसऱ्या मजल्यावरच्या दालनात ठेवलेल्या हत्यारांच्या नावाची पाटी लावली आहे. त्यावर इंग्रजीमध्ये 'अ स्पिअर युज्ड् फॉर हंटिंग अ बिअर(Bear)' या नावाचे 'डुकराची शिकार करण्याचा भाला' असे मराठीत भाषांतर केले आहे. नक्की 'अस्वल' की 'डुक्कर'? येथे चुकीचे भाषांतर केले आहे. आणि या दालनात ठेवलेल्या हत्यारे तलवारी वाटतात, भाले नाही. हाच प्रकार संग्रहालयात इतर ठिकाणी दिसतो.

संग्रहालयातील कर्मचार्यांना विशिष्ट गणवेश दिला तर पर्यटकांना ते सोयीस्कर होईल. तिसऱ्या मजल्यावरच्या दालनात एकजण पेंगत होता तर हेडफोन्स लावून मोबाईल मध्ये व्यस्त होते. पर्यटकांसमोर तरी व्यावसायिक वागणं ठेवावे, पुण्याची प्रतिमा जपावी. आपत्कालीन ऊर्जास्त्रोत (इनव्हर्टर) हे काही कलाकृतींच्या वाटेतील दालनातच उघड्यावर ठेवले आहेत. विद्युतवाहक तारांना लहान मुले किंवा कुणाचा चुकुन हात-पाय लागला तर अपघात होऊ शकतो. कलाकृती व त्यांची सुची (कलाकृती क्रमांक) हे फार उपयुक्त आहे. काही कलाकृती ह्या क्रमांकावरच ठेवल्यामुळे क्रमांक शोधावा लागतो. कलाकृती व त्यांची सुची यांचा मेळ घालावा.

बऱ्याच ठिकाणी संग्रहालयास जर्मनीचे भरीव सहकार्य आहे हे जाणवतं. त्या कलाकृती शेजारी जर्मन भाषेतही माहिती दिल्यास नाविन्यपुर्ण पद्धतीने मांडल्यास तेही आश्चर्यचकित होतील. काही सांस्कृतिक बाबींकडे लक्ष दिलं तर गोष्ट समजण्यास सोपे होईल. संग्रहालयातील काही खिडक्यांचे पडदे स्वच्छ करण्याची गरज आहे. काही ठिकाणी कलाकृतींच्या नावात खाडाखोड करुन हस्तलिखित नोंदपटल तसाच ठेवला आहे. नवीन प्रत प्रिंट करुन लावण्यास किती वेळ लागेल? महानगरपालिकेने तरी याबाबींची नोंद घेवून त्यादृष्टीने राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या संवर्धनासाठी पाऊले उचलावीत हि विनंती
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pay attention to the Kelkar museum culture