चेहरा नसलेली माणसे 

pitre.JPG
pitre.JPG



आज आपण अतिशय मोबाईलवेडे झालो आहोत. एखाद्या आजारी माणसासाठी एक सुंदर पुष्पगुच्छ, त्याच्या खाली "गेट वेल सून' हे मोजके तीन शब्द टाकून खाली हसरा चेहरा टाकला की अगदी "कर्तव्य' पार पाडल्याच्या भावनेने आपण विसरून जातो. 
आपला खरा चेहराच नाहीसा झालाय. चेहरा नसलेल्या माणसांची दुनिया झालीय. भावनाहीन कोरडी, व्यवहारवादी आणि हो... यांत्रिक! 


एका सामाजिक कार्यकर्त्याच्या अकाली निधनानंतर त्याला आदरांजली देण्याकरिता आयोजित ती "शोकसभा' होती. त्याला जाणणारा प्रत्येक जण अर्थातच व्यासपीठावर येऊन त्याचे गुणगान गाऊन पायउतार होत होता. शेवटी त्याची पत्नी उभी राहिली आणि अत्यंत भारावून म्हणाली, ""यांचा लोकसंग्रह पाहून मन अभिमानाने भरून आले. मला प्रथमच हे समजते आहे. पण ते होते तेव्हा मात्र "कुणी भेटत नाही,' "कोणाला भेटायला वेळ नाही,' "नुसते मोबाईलवर तेही मेसेज पाठवताहेत हेच ऐकत आले.'' बाईंना पुढे बोलवले नाही. अगदी गलबलून गेलेल्या. थोडावेळ स्तब्धता. मग एक दाटलेला हुंदका, अन्‌ नंतर त्यांच्या मुलाने त्यांना आधार देऊन घेऊन जाणे. 

आणखी एका प्रसंगात मी एका कलाकारास त्याच्या कलाविष्काराने अपंगामुळे आणि दुर्धर व्याधीग्रस्तांच्या जीवनात काही काळ आनंदाचे कारंजे तुषारविण्यासाठी संस्थेत आमंत्रित केले. मानवतेचे काम म्हणून तो तयारही झाला, पण आयत्यावेळी "महत्त्वाचे ऑफिसवर्क निघाल्यामुळे येता येत नाही,' असा मेसेज मला संस्थाचालकांकडून मिळाला. ज्यांनी तो कार्यक्रम माझ्या मध्यस्थीने आयोजिला होता, त्या अपंग मुलांची व रुग्णाईतांची निराशा व दुःखी चेहरे मला पाहवेनात. शरमल्यासारखे झाले. 
मान्य आहे की खरोखरीच काही न टाळता येण्यासारखे महत्त्वाचे काम असेल, पण मग पर्यायी कार्यक्रम देऊन (दुसऱ्या कलाकारास सांगून) त्या आमंत्रितांची निराशा नसती का टाळता आली? आणि त्याऐवजी एक ओळीचा मोबाईल मेसेज? 

आजकाल शुभकार्याची निमंत्रणेही मोबाईलवरूनच देण्याचा प्रघात सुरू होतोय. निमंत्रण देण्यास वेळ नाही तर प्रत्यक्ष शुभकार्यात कितपत भेट होणार? शुभेच्छा, आशीर्वादही मोबाईलवरून मेसेजेस करूनच पाठवावेत असे तर सुचविण्यात आले नाहीयना? 
एका अर्थी याची चांगली बाजूही असू शकते. अनाठायी खर्च वाचवून तो एखाद्या विधायक कार्यासाठी दिला जातो का? हा एक अनुत्तरित प्रश्‍न उरतोच. 
पण महत्त्वाचे आहे ते माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे. शुष्क भावनाहीन यंत्रणेप्रमाणे नव्हे. शेजारधर्म म्हणावयाचा आणि शेजाऱ्यास मेसेज केला की झाले. 

मला एक सांगा एखादी कलाकृती, सुंदर वस्तू हातात घेऊन पाहिल्याने जास्त आनंद मिळतो की तिचे फॉरवर्डेड चित्र पाहून? ग्रीटिंग कार्ड, पत्र प्रत्यक्ष आल्याचे समाधान, त्यांचे स्कॅन केलेले फोटो पाहून मिळू शकते का? 
छापील अपॉईटमेंट लेटर हाती आल्यावर जिंकल्याचा उन्माद व उमेद मिळते, की गिळमिळीत मोबाईलवर वाचून? अहोऽऽ चित्रपट, नाटक थिएटरमध्ये जाऊनच पाहा ना? रंग, खडू, पेन्सिली, ब्रश मारूनच साजरे दिसतात ना? 

लहानग्यांच्या बाललीला प्रत्यक्ष पाहण्यात वात्सल्य दाटते की त्याचे व्हिडिओ पाहून. निसर्गात प्रत्यक्ष जाऊन आनंद घ्यावयाचा की व्हिडिओ पाहून? छान रचनेने मांडून ठेवलेली पंचपक्वान्ने व्हिडिओ दाखवतोय, पण त्यावर आडवा हात मारायचा नाही. 
थोडक्‍यात, प्रत्येक गोष्ट नैसर्गिकच छान दिसते. ती शाश्‍वत सुख देणारी असते. कृत्रिम प्रदर्शन हे क्षणिक असते. इलेक्‍ट्रॉनिक गॅझेटचा योग्य आणि मर्यादित उपयोग आवश्‍यक आहे. यासाठी सम्यक भान मात्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com