फुरसुंगीत पाईपलाईनचे काम संथ गतीने

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

फुरसुंगी : सासवड रोड रेल्वे स्टेशनमार्गावर संकेत विहार येथे ढेरे काँक्रिट जवळ लोहमार्ग पुलाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून पाईपलाईनचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. उकरलेली माती, दगड पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यावर टाकलेला आहे. यामुळे पुलाखालून भोसले व्हिलेज, श्री गजानन महाराज मंदिर, काळे पडळकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांची खूप गरसोय होत आहे.

 गजानन महाराज मंदिर, काळे पडळकडे जाण्यासाठी हा पर्यायी मार्ग आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण केल्यास काळेपडळ रेल्वे फाटकावरील वाहतूकीचा ताण खूप कमी होतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हे काम पूर्ण करावे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pipeline works slow phrusangi