पालिकेने खड्डे काही बुजवले नाहीत!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 September 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : कोथरूड-पौड फाट्याजवळील शिलाविहार कॉलनीत पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन मार्चमधे टाकली होती. त्यासाठी घेतलेला ट्रेन्च बुजवून त्यावर कॉंक्रीट टाकणे अपेक्षित आहे. परंतू सहा महिने झाले तरी अद्यापही हे खड्डे कॉंक्रिटने बुजविले गेले नाहीत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. वाहनचालकांना यामुळे पाठदुखीचे आजारही होत आहेत. यात वाहनांचेही नुकसान होते.

एक अपघात होऊन एका नामदर्शक बोर्डचे नुकसान याठिकाणी झाले. महापालिकेचे ठेकेदार कामे अपूर्ण ठेवतात त्याचा नागरिकांना खूप त्रास होतो. काम पूर्ण झाले की नाही हे तपासण्याची यंत्रणा महापालिकेकडे आहे की नाही? महापालिकेने खड्डे त्वरीत बुजवून येथील रहिवाशांची त्रासातून मुक्तता करावी.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The pits at pune are not closed by the municipality