पीएमपीएमएल बसेसची देखभाल गरजेची

अजित नाडगीर
Tuesday, 20 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : बीआरटीचे मार्गांचे तर बारा वाजलेलेच आहेत. त्यातच आता त्या मार्गांवर धावणार्‍या बसचे तीन-तेरा. बीआरटी दरवाज्यावरील हा लटकलेल्या पत्राचा तुकडा प्रवाशांवर कधी घाला घालेल हे सांगता येत नाही. अश्या दुर्घटना टाळण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने वाहनांची योग्य देखभाल करावी. यावर उपाय म्हणून वाहक व चालकांनी बसमधल्या त्रुटी आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातल्यास समस्येची योग्य दखल घेतली जाईल. पीएमपीएमएलकडे तज्ञ अभियंते, तंत्रज्ञ, यांत्रिक असतातच. त्यांनी जर वेळोवेळी प्रतिबंधक परिरक्षण केल्यास प्रवासी जीव मुठीत धरुन प्रवास करणार नाहीत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMPML Buses care Needed