परिहार चौकात सिंमेंट पाईपमुळे अडथळा

नितीन राजे 
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

औंध : येथील परिहार चौकात असणाऱ्या महादजी शिंदे पूलाकडून येणाऱ्या पदपथावर गेल्या अनेक महिन्यापासून सिमेंट पाईप ठेवण्यात आले आहे. तसेच पदपथावर केबलही पसरलेल्या आहेत. यामुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरु शकते. आधीच अरुंद असणाऱ्या या पदपथावर दिशादर्शक फलकाचा काही भाग येत असल्याने अडथळा होतो. अत्यंत वर्दळीच्या या मार्गावरील असे अनेक अडथळे दूर करण्याबाबत पालिका पुढाकार घेईल काय ?
 

Web Title: problem due pipes at Parahar Chowk