पदपथाच्या अर्धवट कामामुळे पुणेकर त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 February 2019

सिंहगड रस्ता : हिंगणे विश्रांतीनगरकडून सिंहगड रस्त्याकडे जाताना पदपथाचे काम अर्धवट केले आहे. एचडीएफसी बँकेबाहेर सगळी खडी, राडारोडा तसाच पडून आहे त्यामुळे वाहने नीट पार्क करता येत नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांना खुप त्रास होत आहे  आनंद विहारकडून सिंहगड रस्त्याकडे येणारी वाहने उतारावरून खुप वेगात येतात. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरून आल्यावर विश्रांतीनगरकडे सिल्व्हर क्रेस्ट शाळेकडे वळताना अडथळा होत आहे. त्यामुळे गिरणीच्या अलिकडे गतिरोधरकची गरज आहे. तसेच गार्डन फ्लॅटवाले त्यांचा बागेचा कचरा पण रस्त्यावर टाकतात. त्यात भटक्या कुत्र्यांचा त्रास प्रचंड आहे. कुत्री पाळणारे सुशिक्षित लोक आपल्या कुत्र्यांना घेऊन सकाळी बाहेर रस्त्यावर आणतात. तिथेच घाण करतात आणि निघुन जातात. या सर्वांवर काहीतरी उपाय नक्की कराल अशी अपेक्षा आहे. वंदना जोगळेकर
P09645


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: punekar facing problems due to incomplete work of foothpath